पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान

पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान

एकीकडे बंगालमधील जनता या चक्रीवादळाचा फटका बसून होरपळत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजकारणात मग्न दिसत आहेत. यास चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर बंगाल या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, २८ मे रोजी मंगळवारी दाखल झाले. पण त्यावेळीही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना अर्धा तास ताटकळत ठेवले आणि त्यानंतर फक्त एक अहवाल देऊन त्या निघून गेल्या.

देशभरात कोरोना महामारी सुरू असताना देशातल्या किनारपट्टी भागाला अस्मानी संकटाचाही सामना करावा लागला आहे आणि पश्चिम किनारपट्टीला ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसला तर पूर्व किनारपट्टीला ‘यास’ या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळात ओरिसा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना चांगलाच तडाखा बसला आहे. त्यात एकीकडे ओडीसा कडून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याद्वारे सामंजस्याची भूमिका घेत केंद्राला कोरोना संकटाचा विचार करता आम्हाला पॅकेज नको असे सांगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळाच्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींना भेटीसाठी ही तात्काळ ठेवल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

बिल्डर युसूफ लकडावाला याला ईडीने केली अटक 

बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक

‘मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतात राजकीय कुरघोडी’

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

पश्चिम बंगाल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनकड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांसमवेत यास वादळाचा फटका बसलेल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेणार होते. पण ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. आधी त्यांनी पंतप्रधान आणि राज्यपाल यांना अर्धा तास ताटकळत ठेवले. तर नंतर येऊन त्या “मी तुम्हाला भेटण्यासाठी इथे आले आहे,मला आणि मुख्य सचिवांना तुम्हाला एक निवेदन द्यायचे आहे असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांकडे एक निवेदन सादर केले पण पुढील काही काम लागले असून मला मुख्य सचिवांसोबत जावे लागेल असे म्हणत त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

ममतांच्या या वर्तनावर समाज माध्यमांवर सडकून टीका होत आहे भाजपनेते ममतांच्या या वागणूक वरून संतापलेल्या दिसत असून ते मतांवर निशाणा साधताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वे मंत्री पियुष गोयल

Exit mobile version