‘सामना’त ममतांच्या नथीतून उद्धव ठाकरेंवर तीर?

‘सामना’त ममतांच्या नथीतून उद्धव ठाकरेंवर तीर?

लेकी बोले सुने लागे, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. तसेच काहीसे ‘सामना’ने केले आहे की काय? भारताच्या पूर्व किनारपट्टीला ‘यास’ वादळाचा धोका लक्षात घेता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार आहेत, याचे कौतुक बुधवारच्या ‘सामना’च्या अंकात करण्यात आले आहे. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

या बातमीतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलेला नाही ना, असे भातखळकर यांना सुचवायचे आहे.

हे ही वाचा:

पुण्यात होम आयसोलेशनवर बंदी नाही

ग्लोबल टेंडरिंगला ‘मराठी’त प्रतिसाद नाही, ‘हिंदी’त आहे

३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास

अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?

 

या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात की, संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्ध्वजींवर. तौक्ते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मारून बसले होते, हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा… सामनाची बातमी… ‘यास’ वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’ मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये.
महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळ आलेले असताना मुख्यमंत्र्यांनी कुठेही भेट दिली नव्हती. वादळानंतर अवघ्या तीन तासांचा कोकण दौरा करून ते मुंबईत परतले होते. त्यावर जोरदार टीका झाली होती. एकीकडे ममता बॅनर्जींचे कौतुक सामनातून केले जात असताना एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न खुद्द सामनातूनच करण्यात आला असला पाहिजे, अशी मल्लीनाथी भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रात आलेल्या विविध संकटांच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनसामन्यांत मिसळत असल्याचे पाहण्यात आलेले नाहीत. त्यावरून ते सातत्याने टीकेचे लक्ष्य बनले आहेत.

Exit mobile version