निवडणूक आयोगाने कारवाई करत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार करण्यास बंदी घातल्यानंतर ममता दीदी या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आता या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे. कोलकातामधील गांधी मूर्ती परिसरात ममता बॅनर्जी यांचे हे आंदोलन सुरु आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची कारवाई केल्यानंतर ममता दीदींनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आहे. मंगळवार १३ एप्रिल रोजी ममता बॅनर्जी या सकाळी ११.४० च्या सुमारास धरणे आंदोलन करण्यासाठी गांधी मुर्ती परिसरात दाखल झाल्या. व्हीलचेअर वर बसून ममता दीदींचे हे आंदोलन सुरु आहे. चित्रकलेची आवड असणाऱ्या ममता बॅनर्जी हे आंदोलन करताना चित्र रेखाटतानाही दिसून आल्या.
हे ही वाचा:
टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!
कुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा
भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे
क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
ममता बॅनर्जींवर का आहे प्रचारबंदी?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना २४ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. १२ एप्रिल रात्री ८ पासून ते १३ एप्रिल रात्री ८ पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. ममता बॅनर्जी यांनी प्रचार करताना राज्यातील मुसलमान समाजाने तृणमुलला मोठ्या संख्येने मतदान कारावे असे म्हटले होते. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.