ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार

ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा पहिला बांगला अकादमी पुरस्कार स्वतःलाच दिला आहे. यावर्षीच या पुरस्काराची घोषणा झाली आणि पहिल्या पुरस्काराने ममता बॅनर्जी यांना त्यांच्या काव्यसंग्रहासाठी सन्मानित करण्यात आले. कबिता बितन असे त्यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे.

पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक विभागातर्फे या पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवि प्रणाम असे या कार्यक्रमाचे नाव होते आणि तिथे ममता बॅनर्जी यांना गौरविण्यात आले.

पण या कार्यक्रमासंदर्भात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, मंचावर त्या बसल्या होत्या पण हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला नाही. हा पुरस्कार शिक्षण मंत्री बर्त्य बासू यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्वीकारला.

हे ही वाचा:

संतूरसूर हरपला!

महाविकास आघाडी विरोधात राष्ट्रवादीत मतप्रवाह

राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार

 

राज्यातील काही साहित्यिकांच्या समितीने ममता बॅनर्जी यांचे नाव या पुरस्कारासाठी निवडले. २०२०मध्ये ममता बॅनर्जी यांचे कबिता बितन हे पुस्तक प्रकाशित झाले होते. कोलकाताच्या एका पुस्तक महोत्सवात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ९४६ कविता आहेत.

साहित्याची सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. अन्य क्षेत्रात काम करत असताना साहित्यक्षेत्राची सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भाजपाच्या नेत्यांनी या पुरस्काराची खिल्ली उडविली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःलाच पुरस्कार दिल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे बांगला अकादमीच्या वतीने हा जो पुरस्कार गेला आहे, त्याचे अध्यक्ष शिक्षणमंत्री बर्त्य बासू हेच आहेत.

 

Exit mobile version