ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा नरुला यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळशाच्या तस्करीच्या आरोपाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. या प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यासाठी सीबीआयचे पथक आज बॅनर्जी यांच्या घरी कोलकाता येथे आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची आज त्यांच्याच घरी चौकशी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना कोळसा माफियांनी नियमित ‘कटमनी’ दिल्याचा आरोप केला जात आहे. पक्षाचे युवा नेते विनय मिश्रा यांच्यामार्फत हा पैसा काळ्याचा पांढरा (मनी लाँड्रिंग) करण्यात आला होता. सध्या हा विनय मिश्रा फरार आहे. एजन्सीने त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले आहे.
हे ही वाचा:
ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कुनुस्टोरिया व कजोरिया भागातील कोळसा खाणींतून अनधिकृतपणे खाणं करणे आणि कोळशाची चोरी करणे या प्रारणांमध्ये सीबीआयने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्येच गुन्हा दाखल केला होता.
अभिषेक बॅनर्जी हे सध्या पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे राजकीय वारस म्हणून अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पहिले जात आहे. तृणमूल काँग्रेसमधील या वंशवादामुळेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.