ममतांचे दुखापतीनंतरचे अजब विधान, हिंदू देवतांबद्दल काय बोलल्या?…

ममतांचे दुखापतीनंतरचे अजब विधान, हिंदू देवतांबद्दल काय बोलल्या?…

Souce:ANI

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एका प्रचारसभेत अजब दावा केला. भाजपाला मतदान केलंत तर तुमच्या धर्मावर संकट येईल असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले. याशिवाय बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात पुजल्या जाणाऱ्या दुर्गा या श्रीरामांपेक्षा मोठ्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आजवर मुस्लिम मतांवर अवलंबून राहून राजकारण केले. एका सर्वेनुसार २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला ६५-७० टक्के हिंदूंची मतं मिळाली होती. तर एवढ्याच प्रमाणात मुस्लिम मतं ही तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळाली होती. यामुळेच तृणमूल पक्षाला ४२ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या.

याशिवाय ममतांनी २०१५-१८ च्या काळात, अनेकवेळा मुस्लिम लांगूलचालन केल्याच्या घटना देखील भाजपाने पुढे आणल्या होत्या. यामध्ये रस्त्यावर नमाज पढण्यासाठी परवानगी देण्यापासून ते, कलकत्त्यातील दुर्गा पूजेचे पंडाल हटवण्याच्या निर्णयापर्यंतचे अनेक निर्णय आहेत.

हे ही वाचा:

कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?

परंतु आता नंदीग्राममधून निवडणुकीचा अर्ज भरताना ममता बॅनर्जींनी अनेक देवी-देवतांचे दर्शन घेतले. त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक सभेतून मी हिंदू आहे आणि भाजपाने मला हिंदू धर्माबद्दल सांगू नये असे सांगितले. भाजपाला मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील हिंदूंच्या पाठिंब्यामुळेच ममतांना आता हिंदूंच्या मातांसाठीही प्रचार करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version