पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला फोन करून मदत करायला सांगितल्याची घटना समोर आली होती. ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बावचळलेल्या दिसत आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रलोभन दाखवून फितवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जात आहे. या घटनेवर आता ममता बॅनर्जी यांनी हे संभाषण प्रसिद्ध करणं हा गुन्हा असल्याचं सांगितलं आहे.
शनिवारी सकाळी पाऊणे बाराच्या सुमारास बंगाल भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांना कॉल करून नंदीग्राम मध्ये निवडणूक जिंकण्यासाठी विनवण्या करत असल्याचा आरोप या व्हिडिओसोबत केला आहे. प्रलय पाल असे या भाजपा जिल्हा उपाध्यक्षाचे नाव आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची
पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस
ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ
दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात
काय आहे हे संभाषण?
ममता बॅनर्जी: तू एक होतकरू तरुण आहेस. तू खूप काम करतोस हे मला माहित आहे. कृपया या क्षेत्रात आम्हाला थोडी मदत कर. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
प्रलय पाल: दीदी माझं कुटुंब राजकारणात तुमच्यामुळे आले. जेव्हा निवडुणूकांचे निकाल लागले आणि तुम्ही मुख्यमंत्री होणार हे समजले, तेव्हा आम्ही ५ ब्राह्मणांना बोलवून घरी पूजा घातली होती आणि मिरवणूक काढली होती. पण त्रास याचा होतो की एवढे सगळे त्याग करूनही आम्हाला साधे नागरिकता प्रमाणपत्र मिळत नाही. हे खूप अपमानास्पद आहे.
ममता बॅनर्जी: पण मला नंदीग्राम मधल्या स्थानिक तृणमूल नेतृत्वाने (सुवेंदू अधिकारी) नंदीग्राम मध्ये येण्यास मज्जाव केला होता.
प्रलय पाल: पण मला साधे नागरिकतेचे प्रमाणपत्र मिळत नाही हे कसे शक्य आहे? तुमच्या महादेवने (तृणमूल कार्यकर्ता) तर माझ्यावर हल्ला केला.
ममता बॅनर्जी: या बद्दल मला माहितीच नव्हते. आत्ताच मला याविषयीची माहिती मिळत आहे.
प्रलय पाल: दीदी तुमचे काहीही म्हणणे असले तरी मी आता तृणमूल पक्ष सोडला आहे आणि मी सध्या ज्या पक्षात आहे त्यांचा विश्वास मी नाही मोडू शकत.
ममता बॅनर्जी: तू आता ज्या पक्षात आहेत तिथले लोक प्रामाणिक आहेत असे तुला वाटते का?
प्रलय पाल: हो ते प्रामाणिक असल्याची मला खात्री आहे आणि भाजपा जोपर्यंत योग्य पथावर आहे तोपर्यंत मी भाजपासाठी काम करत राहीन. अधिकारी परिवार गेले अनेक वर्ष माझ्या पाठीशी उभा आहे. त्यांचा आणि माझा ४० वर्षांचा स्नेह आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा माझ्यावर अत्याचार केले तेव्हाही अधिकारी माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. तुम्ही एवढ्या मोठ्या राजकारणी असून मला फोन केलात याचा मला आनंद आहे. पण मला माफ करा.
या संभाषणाला आधी खोटं ठरवून असं काही झालंच नाही असं सांगण्याचा प्रयत्न तृणमूलकडून करण्यात आला होता. पण आता ममता बॅनर्जींनीच हे संभाषण शेअर करणे कायद्याविरोधी आहे असे सांगून हे संभाषण खरे असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.