ममता बॅनर्जींचे वरातीमागून घोडे

ममता बॅनर्जींचे वरातीमागून घोडे

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सिलिंडर्स आणि कोरोनासंदर्भातील औषधांवरील जीएसटी किंवा सीमाशुल्कात सूट देण्यात यावी, असे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. पण ही सूट यापूर्वीच देण्यात आली आहे, याची आठवण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करून दिली आहे.

हे ही वाचा:

पतीच्या संशयाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

यश आलं की राज्याचं,अपयश आलं की केंद्राचं

लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र ट्विट केल्यानंतर त्यावर अर्थमंत्र्यांचे ट्विट जारी झाले असून त्यात आयात उत्पादनांवरील जीएसटीत सूट देण्यात आल्याचा निर्णय ३ मे रोजीच घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सीमाशुल्क आणि आरोग्यविषयक वस्तूंवरील अधिभारात सूट देण्याचा निर्णय तर त्याआधीचाच आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी कोणत्या वस्तूंवर या सगळ्या करात सूट देण्यात आली आहे, याची एकदा माहिती करून घ्यावी असेही म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक संस्था आम्हाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सिलिंडर्स, क्रायोजेनिक टॅक्स, टॅंकर्स, कोरोनाशी संबंधित औषधे देण्यास तयार आहेत. पण त्यांना या सामुग्रीवर जीएसटी, सीमाशुल्क यात सूट हवी आहे. ती केंद्राने द्यावी.

एकूणच ममता यांना केंद्राकडून ही सूट आधीच देण्यात आल्याची माहिती देण्यात आली नाही किंवा त्या समन्वयाअभावी त्यांनी हे पत्र लिहिले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यात केंद्र मदत देत नाही म्हणून दिल्ली, महाराष्ट्रातील राज्य सरकारांकडून ओरड केली जाते. मात्र दिलेल्या मदतीचा उल्लेख करण्याचे टाळतात. ममतांनीही केंद्रावर निशाणा साधण्याचा प्रयत्न या पत्राच्या माध्यमातून केला पण तो फसला आहे.

Exit mobile version