आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली धर्मरक्षाबंधनाची हाक
मालवणीत हिंदू कुटुंबांवर होत असलेला अन्याय आणि त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी येत असलेला दबाव याविरोधात सातत्याने आवाज उठविणारे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी धर्मरक्षाबंधनाची हाक देत तेथील समस्त हिंदुंना या मालवणी पॅटर्नविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. आता अत्याचार, दुराचार सहन केला जाणार नाही. मालवणी पॅटर्नची मुंबईत पुनरावृत्ती होऊ देणार नाही, अशी घोषणा आमदार लोढा यांनी केली.
मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मालवणीतील हिंदू महिलांचे तसेच हिंदू बांधवांचे विशेष आभार मानले. तुमच्यामुळेच मालवणी पॅटर्नविरोधात आवाज उठविला गेला आहे, असे सांगत मालवणी पॅटर्नला रोखण्याचे काम आपण केलेत आणि यापुढेही करत राहाल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या हिंदू भगिनींनी या मालवणी पॅटर्नला विरोध करण्याची हिंमत दाखविली त्याला मी वंदन करतो, असेही आमदार लोढा म्हणाले.
हा भारत आहे. ही धर्मशाळा नाही. इथे बांगलादेशी येणार, रोहिंग्या येणार आणि वस्ती करणार. नंतर आपल्याच लोकांना बाहेर हुसकावून लावणार हे यापुढे चालणार नाही. हिंदू आता जागृत झाले आहेत, असे आमदार लोढा म्हणाले.
अब अत्याचार, दुराचार नहीं चलेगा। #MalvaniPattern को मुंबई भर में पनपने नहीं देंगे। #धर्मरक्षाबंधन कार्यक्रम में सभी बहनों ने लिया संकल्प।@narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @CTRavi_BJP @BJP4Mumbai @BJP4India @abpmajhatv @MiLOKMAT @TV9Marathi @LoksattaLive pic.twitter.com/otvQhTIc7Q
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 23, 2021
आमदार लोढा यांनी विधानसभेतही या विषयावर आवाज उठविला होता. हिंदुंविरोधात चालविल्या जात असलेल्या मालवणी पॅटर्नविरोधात त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. ते म्हणाले होते की, श्रीराम मंदिराच्या निधीसंकलनावेळी मालवणीत प्रभू श्रीरामांचे पोस्टर्स पोलिसांकडून हटविण्यात आले होते. यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली नाही.