30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणलंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

Google News Follow

Related

थकलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर लंडन येथील आलिशान घरातूनही बेदखल होण्याची वेळ आली आहे. स्विस बँक यूबीएस सोबत प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या वादात विजय मल्ल्याला त्याचे लंडनमधील राहते घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. घरातून बाहेर काढण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी याचिका त्याने ब्रिटिश न्यायालयात केली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. आणि मल्ल्या कुटुंबाला हे घर ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले आहेत.

भारतातून फरार झाल्यापासून मल्ल्या लंडनमधील याच घरात राहत होता. हे घर लंडन येथील रीजेंट पार्क मध्ये १८/१९ कॉर्नवाल टेरेस लक्जरी अपार्टमेंटमध्ये आहे. तो त्याच्या ९५ वर्षीय आई ललीता आणि मुलगा सिद्धार्थसोबत राहायचा. २०१२ मध्ये हे घर त्याने जवळपास २ बिलियन कर्ज मिळवण्यासाठी पाच वर्ष मुदतीवर यूबीएसकडे गहाण ठेवले होते. २०१७ मध्ये पाच वर्ष उलटूनही परतफेड न झाल्याने यूबीएसने न्यायालयात दावा दाखल केला होता.

हे ही वाचा:

कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा

मुलायम परिवारातही आता भा’जप’

पर्यटन बंद झाले आणि थायलंडमध्ये माकडांनी शहरांत घातला धुमाकूळ

सपाचे आमीष…फॉर्म भरा, ३०० युनिट वीज मिळवा!

 

लंडनच्या हायकोर्टाच्या चांसरी डिव्हीजनचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी आपल्या निर्णयात म्हटले की, मल्ल्या परिवाराला आपल्या संपत्तीचा भरणा करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास कोणतेही सबळ कारण नाही. म्हणून मल्ल्या याला आपल्या संपत्तीतून बेदखल करण्यात येणार आहे.

भारतातही त्याच्या बंद झालेल्या किंगफिशर एअरलाईन्सशी संबंधीत ९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत प्रकरणी मल्ल्या आरोपी आहे. मल्ल्याला लंडनमधील घराबाहेर काढले जाणे हे त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेस मदतकारकच ठरणार आहे. जुलै २०२१ मध्ये लंडन न्यायालयाने त्याला दिवाळखोर घोषित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा