काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणकोणते उमेदवार असणार याची चर्चा सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर त्यांनी आज राज्यसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता खरगे यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाकडे सोपवणार याकडे देखील लक्ष असणार आहे.
एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान हे बोलून दाखवले होते.
हे ही वाचा:
“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”
कांदिवलीत झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू
याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल
मासेमारीसाठी गेलेले १६ मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांनी ३० सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, यातही मल्लिकार्जुन खरगे हेच अध्यक्षपदी निवडून येतील अशा चर्चा आहे. १७ ऑक्टोबरला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे तर १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.