हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!

अचलपूरमधून योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेससह खर्गेंवर निशाणा

हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार कार्याला वेग आला आहे. नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ही राज्यात विविध ठिकाणी सभा घेत असून विरोधकांवर निशाणा साधत आहेत. अचलपूर येथील सभेत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधला.

योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. भाजपाने ही घोषणा लावून धरली असून विरोधक त्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या नाऱ्याला विरोध करत टीका केली आहे. मात्र, आता योगी आदित्यनाथ यांनीही खर्गे यांच्यावर पलटवार करत टीकास्त्र डागले आहे. योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, “मल्लिकार्जुन खर्गे यांचे गाव हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होते. हिंदूंना मारण्यात येत होते. यातच मल्लिकार्जुन खर्गे यांचे गाव जाळण्यात आले होते. यात त्यांची आई आणि कुटुंबियांचा दुर्दैवी अंत झाला होता. पण, मल्लिकार्जुन खर्गे यावर भाष्य करणार नाहीत कारण तसं केलं तर त्यांची मते घसरतील असे त्यांना वाटते. खर्गे यांना सत्य स्वीकारायचे नाही. मतांसाठी कुटुंबाचा त्याग ते विसरले आहेत,” अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

निवडून येण्याचे आव्हान वाटत नाही, पाय जमिनीवरच, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित!

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी मविआचाही प्रचार करावा!

उद्धव ठाकरेंची बॅग पुन्हा तपासली

बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

योगी आदित्यनाथ म्हणाले की, “आमच्यात फूट पडली, तर गणपती पूजेवर हल्ला होईल. लँड जिहाद अंतर्गत जमिनी बळकावल्या जातील. मुलींची सुरक्षा धोक्यात येईल. आज उत्तर प्रदेशमध्ये कोणीही लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद करणार नाही, आमच्या मुलींच्या सुरक्षेत कोणी अडथळे आणले किंवा सरकार आणि गरिबांच्या जमिनी बळकावू पाहत असेल तर त्याची तिकीट कापायला यमराज तयार आहे, अशी घोषणा केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये माफिया होते आणि आधीचे सरकार त्यांना सुरक्षा देत होते पण, आता ते सगळे नरकाच्या वाटेवर आहेत.

Exit mobile version