गांधी कुटुंबियांच्या मर्जीतले खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.

गांधी कुटुंबियांच्या मर्जीतले खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यात खर्गे यांनी शशी थरूर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना १ हजार ७२ मते पडली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजार ३८५ जणांनी मतदान केले होते. जवळपास २५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. विशेष म्हणजे यंदा २५ वर्षानंतर गांधी कुटुंबा बाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी असणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत जवळपास ९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

हे ही वाचा:

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा म्हणून काम बघत होत्या. अध्यक्ष पदाची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी इच्छा अनेक काँग्रेस नेत्यांनी दर्शवली होती, मात्र राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नकार दिला होता.

Exit mobile version