मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते

मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते

गेल्या आठवड्या राज्यसभेतील चार काश्मिरी नेत्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यापैकी एक काँग्रेस पक्षाचे नेते आणि सभागृहातील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद हे देखील आहेत. लवकरच त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिकामं होणार असल्याने काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे केलं आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी भावूक होऊन केला गुलाम नबी आझाद यांना ‘सलाम’

मल्लिकार्जून खर्गे यांनी लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद २०१४ ते २०१९ या काळात भूषविले होते. परंतु २०१९च्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये खर्गे यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून गणले जाते. आता, राज्यसभेत आझाद यांच्या निवृत्तीमुळे रिकाम्या होत असलेल्या विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडून त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खर्गे आपल्या पक्षासाठी संसदेत दिसणार आहेत.

निवृत्त होणाऱ्या संसद सदस्यांचा एक तऱ्हेचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी पंतप्रधानांचे भावूक होऊन केलेले भाषण चांगलेच गाजले. यावेळी पंतप्रधानांनी सांगितले, की गुलाम नबी आझाद यांच्या जागी येणाऱ्या नेत्याला गुलाम नबी आझाद यांची उंची गाठणं अशक्य आहे. कारण त्यांनी केवळ स्वतःच्या पक्षाची नाही, तर देशाची आणि सदनाचा देखील विचार केला.

Exit mobile version