महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे प्रकरण बुधवारी दिवसभर चांगलेच चर्चेत होते. जवळपास साडेआठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने मलिक यांना अटक केली. पण अटक करून त्यांना ईडी कार्यालयातून बाहेर आणण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याबद्दल काहीकाळ सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. त्यांना ईडीने सोडले का, ईडीला सगळी माहिती देऊन ते घरी परतणार असे तर्क लढविले जाऊ लागले.
पहाटे ४.३० वाजता मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी धडकले. त्यांनी नंतर त्यांना ताब्यात घेत ईडीच्या कार्यालयात आणले. तिथे त्यांची साडेआठ तास चौकशी सुरू होती. त्यानंतर दुपारी ३च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांनी मूठ वळून हवेत हात उंचावला आणि जणू विजयी झाल्याचे त्यांनी दाखविले.
तेव्हा त्यांना ईडीने सोडल्यासारखे वाटू लागले. पण तेवढ्यात ईडीने त्यांना अटक केल्याचे दाखविले गेले. तेव्हा मलिक हे ईडी अधिकाऱ्यांच्या गाडीकडे चालत गेले. तिथे त्यांनी गाडीत बसल्यावर झुकेंगे नही, लडेंगे और जितेंगे अशी प्रतिक्रिया उपस्थित मीडियाला दिली. पण बाकी त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. गाडीजवळ आल्यानंतर एकच गलका झाला. पण त्यांना प्रतिक्रिया देता येणार नाही, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’
साडे आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न
मलिक बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहात हात उंचावला. पण त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी गाडीतून नेले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मनीलॉन्ड्रिंग व जमीन व्यवहार असे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यावरूनच त्यांना अटक करण्यात आली.