मलाला, कट्टरतावादी अजेंडा चालवते! भाजपा नेते कपिल मिश्रांचा निशाणा

मलाला, कट्टरतावादी अजेंडा चालवते! भाजपा नेते कपिल मिश्रांचा निशाणा

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात पाकिस्ताननेही आपली भूमिका बजावली आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कार्यकर्त्या मलाला युसूफझाईने एक ट्विट केले होते, त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी मलाला युसूफझाईच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करत मलालाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तानमध्ये मुस्लिम मुलींची हिजाब न घातल्यामुळे त्यांची हत्या केली जात आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख मुलींची केवळ हिंदू आहेत म्हणून हत्या केली जात आहे. खर्‍या मुद्द्यांवर तिने एक शब्दही उच्चारला नाही. मलाला कट्टर इस्लामी जिहादी अजेंडा चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर, भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही मलालाच्या भारतातील हिजाबच्या वादावरच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मलालाने पाकिस्तानातील अल्पवयीन हिंदू आणि शीख मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यासारख्या मुद्द्यांवर मलाला कधीच का बोलली नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

पश्चिम बंगाल निवडणूक हिंसाचार प्रकरणी तिघांना अटक

संजय राऊत हे छळ होत असल्याची आवई उठवत आहेत!

काय म्हणाल्या मलाला युसुफझाई?

पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसुफझाईने कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावर भाष्य केले होते. यासंदर्भात तिने ट्विट केले की, ” मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्यास नकार देणे हे भयावह आहे. महिलांचे उद्दिष्ट कमी-अधिक प्रमाणात एकच आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे. ” असं त्यांनी ट्विट केले होते.
यावरून वाद आणखी वाढला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. यावरून राजकारणही सुरू झाले आहे. मुस्लिम महिला हिजाबच्या बाजूने तीव्र आंदोलन करत आहेत.

Exit mobile version