अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले

नाव हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले

मालाड येथील एका उद्यानाला देण्यात आलेले टिपू सुलतानचे नाव लवकरच हटवण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. लोढा यांनी मालाडच्या उद्यानातून उद्यानातून टिपू सुलतानचे नाव हटवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या उद्यानाचे नामकरण टिपू सुलतानच्या नावावर करण्यात आले. मात्र, त्याला भाजपकडून सातत्याने विरोध केला जात होता. आता पालक मंत्र्यांनी उद्यानाचे नाव बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अखेर आंदोलन यशस्वी… गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा @iGopalShetty जी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले असे लोढा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

मालाडचे आमदार अस्लम शेख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. अस्लम शेख यांनी आमदार कोते यांच्या मदतीने मालाडमध्ये हे उद्यान बांधले आणि त्याला म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांचे नाव दिले. मात्र, या उद्यानाला टिपू सुलतानच्या नावावरून भाजपने सुरुवातीपासूनच विरोध केला होता. गेल्या वर्षी २६ जानेवारीला भाजप आणि बजरंग दलाशी संबंधित लोकांनी उद्यानाचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी विरोध केला होता. त्यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा:

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

या उद्यानावरून भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या नावावर इतरांना सल्ला देतात, आता त्यांच्याच सरकारमध्ये मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव दिले जात आहे. टिपू सुलतानने हजारो हिंदूंची हत्या केल्याचा आरोप राम कदम यांनी केला होता. २०१९ मध्ये तत्कालीन कर्नाटक सरकारने टिपू सुलतानच्या जयंती उत्सवावर बंदी घातली होती. दुसरीकडे, विरोधी पक्ष काँग्रेसने टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Exit mobile version