26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणरणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह

रणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह

‘मेक श्युअर गांधी इज डेड’ या त्यांच्या पुस्तकाचे झाले प्रकाशन

Google News Follow

Related

महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने केली याविषयी आतापर्यंत अनेक संशोधने झालेली आहेत. मात्र या संपूर्ण घटनाक्रमातले जळजळीत वास्तव वेगळे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हे वास्तव आपल्या पुस्तकातून मांडले आहे. तत्कालिन सत्तेत बसलेल्या लोकांनी गांधीहत्या आपले इप्सित साध्य करण्यासाठी घडवून आणली होती अशा गंभीर निष्कर्षाप्रत नेणारे आणि त्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.  ‘मेक श्युअर गांधी इज डेड’ हे गांधी हत्येसंदर्भातील खाचाखोचा सांगणारे, त्यावर परखड भाष्य करणारे पुस्तक आहे. तब्बल ७ वर्षांच्या अथक संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक नवी दिल्लीत प्रकाशित केले आहे.

हे पुस्तक २० जानेवारी १९४८ ते ३० जानेवारी १९४८ या कालावधीतील रोजच्या घटनांवर आधारित आहे. ३१ जानेवारी १९४८ला गांधीजींची हत्या झाली. याच काळात गांधीजींना मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न आणि नंतर प्रत्यक्ष हत्या अशा दोन्ही वेळेला त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात अक्षम्य हेळसांड करण्यात आली, हेदेखील या पुस्तकात मांडण्यात आले आहे.

हत्येच्या तपासातही हयगय करण्यात आली. त्यामुळेच गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची हत्या करण्याचा आणखी एक यशस्वी प्रयत्न करण्याची संधी मिळाली. अशा पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली, त्यांना गौरविण्यात आले. हे सगळे कसे घडले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते.

सात वर्षांपूर्वी रणजित सावरकरांनी या पुस्तकासाठी संशोधन करायला प्रारंभ केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येत गुंतविण्यासाठी गेल्या ७५ वर्षांपासून सातत्याने दुष्प्रचार केला गेला. राजनैतिक लाभ उठविण्यासाठी सावरकरांना या हत्येवरून बदनाम करण्यात आले. रणजित सावरकर यांनी यासाठी कपूर आयोगाच्या अहवालाचा सखोल अभ्यास केला. त्याशिवाय, तत्कालिन न्यायालयाच्या कागदपत्रांचा व अन्य दस्तऐवजांचाही अभ्यास केला. त्यातून ते या निष्कर्षाप्रत पोहोचले की, आपले छुपे हेतू साध्य करण्यासाठी गांधीहत्या सत्तेतील लोकांनी घडवून आणली.

हे ही वाचा:

लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!

येत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवास्थानी ईडीचे पथक दाखल!

मालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!

रणजित सावरकर म्हणतात की, सत्तेत बसलेल्या लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी जे घृणास्पद काम केले, त्याचा पर्दाफाश हे पुस्तक करते. पोलिस अधिकारी व मंत्र्यांनी नथुराम गोडसे व इतरांबद्दल हे सगळे पूर्णपणे जाणून होते. मात्र तरीही गोडसेला अटक करण्याचा किंवा त्याची चौकशी करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. सावरकर म्हणतात की, या पुस्तकाचा कोणताही अजेंडा नाही. पण फॉरेन्सिक तंत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीची मीमांसा आहे.

यात एक गोष्ट स्पष्ट झाली की, गांधीजींच्या शरीरावरील जखमा या नथुराम गोडसेच्या पिस्तुलातील गोळ्यांच्या आकाराशी मेळ खात नाहीत. हे आकार ९ मिमीपेक्षा कमी आहेत. रणजित सावरकरांनी यासंदर्भात फॉरेन्सिक तज्ज्ञ व प्रमुख क्रिमिनल वकिलांशी चर्चा करून त्याचा आधार आपल्या पुस्तकासाठी घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा