28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारण“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

अमित शाह यांचा बिहारमधून इशारा

Google News Follow

Related

गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. बिहराच्या मधुबनी येथील रॅलीत जनतेला संबोधित करताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. देशातील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराला जोरदार वेग आला असून शुक्रवार, १७ मे रोजी पाचव्या टप्प्याच्या  प्रचारतोफा थंडावणार आहेत.

या प्रचारादरम्यान, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता अमित शाह यांनी गोहत्या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना थेट इशाराचं दिला आहे. तसेच, गोहत्येत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, असे आवाहनही जनतेला केले आहे. बिहार आणि आसपासच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोहत्या प्रकरणं समोर येत होती. यावर अमित शाह म्हणाले की, “नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू,” असा आक्रमक इशाराचं त्यांनी दिला आहे.

अमित शाह शाह यांनी यावेळी इंडी आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. “इंडिया आघाडीवाले म्हणतात की, पीओकेची गोष्ट करु नका, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. पण, मी त्यांना म्हणतो की, पाकिस्तानच्या अणुबॉम्बला तुम्हीच घाबरुन रहा. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारत एवढा मजबूत बनला आहे की, कुणीही अणुबॉम्बला घाबरण्याची गरज नाही,” असा विश्वास त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीर आपलाच असल्याचे म्हणत आम्ही तो मिळवणारच, असेही प्रतिपादन केले आहे.

हे ही वाचा:

शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!

कर्पूरी ठाकूर यांच्यावरूनही अमित शाह यांनी आरजेडीवर निशाणा साधला. “मला लालू यादव यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही बिहारमध्ये १५ वर्षे आणि केंद्रात १० वर्षे मुख्यमंत्री आणि मंत्रीपद भूषवले. कर्पूरी ठाकूर यांना तुम्ही कधीच भारतरत्न देऊन सन्मानित केले नाही,” असा सवाल त्यांनी विचारला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा