राहुल गांधी यांनी २०२० पासून आतापर्यंत ११३ वेळा सुरक्षितता नियमांचे उल्लंघन झाल्याचा अहवाल अलिकडेच केंद्रीय राखीव पोलीस दलाने दिला होता. भारत जोडो यात्रेत मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमधून जात आहे.मंगळवारी राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. होशियारपूरच्या दसुहामध्ये एका व्यक्तीने सुरक्षाकडे तोडत राहुल गांधींच्या जवळ जाऊन थेट त्यांना मिठी मारली.
राहुल गांधी यांच्या जवळ येताच सुरक्षा कर्मचारी आणि नेते सक्रिय झाले आणि त्यांनी त्यांना तत्काळ तेथून हटवले. या घटनेनंतर आता एवढ्या कडेकोट बंदोबस्तात एखादी व्यक्ती राहुल गांधींच्या इतकी जवळ कशी जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिल्लीत राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याची तक्रार काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाने राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी गृह मंत्रालयाला उत्तर सादर केले. २०२० पासून राहुल गांधी यांनी ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यानच त्याने अनेकवेळा सुरक्षेच्या निश्चित सूचनांचे उल्लंघन केले आहे. याबाबत त्यांना वेळोवेळी माहितीही देण्यात आली आहे.असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने स्पष्ट केले होते.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
पंजाब काँग्रेसने राहुल यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा इन्कार केला आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत कोणतीही चूक झालेली नाही. त्याचा एक चाहता त्याला मिठी मारण्यासाठी आला होता. त्याचा हेतू वाईट नव्हता असे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग म्हणाले. पंजाबचे आयजी जीएस ढिल्लन म्हणाले की, व्हिडिओवरून असे दिसते की ही सुरक्षेतील त्रुटी आहे. आम्ही चोख व्यवस्था केली आहे. त्याने राहुल गांधींना ज्या पद्धतीने मिठी मारली ते अपेक्षित नव्हते. तो कोणाच्या सांगण्यावरून आला होता की कुणासोबत आला होता याची खात्री होईपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही.