महुआ मोइत्रा यांच्या परदेश दौऱ्याची चौकशी?

मोइत्रा यांनी परदेशदौऱ्यापूर्वी लोकसभेकडून रीतसर परवानगी घेतली होती का, याची चौकशी होईल

महुआ मोइत्रा यांच्या परदेश दौऱ्याची चौकशी?

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या भोवती चौकशीचा फास आवळला जात आहे. गेल्या पाच वर्षांत मोइत्रा यांनी केलेल्या परदेश दौऱ्याची विस्तृत माहिती लोकसभेची नैतिक समिती गृह मंत्रालयाकडून मागवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खासदार असल्याने महुआ मोइत्रा यांनी परदेशदौऱ्यापूर्वी लोकसभेकडून रीतसर परवानगी घेतली होती का, तसेच, अन्य परवानग्या घेतल्या होत्या का, याची माहिती संसदीय समिती मागवू शकते. प्रश्नांसाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात संसदीय समितीने याआधीच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मोइत्रा यांच्या संदर्भात माहिती मागवली आहे. गुरुवारी लोकसभेच्या नैतिक समितीने महुआ मोइत्रा यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव

इंग्लंडला श्रीलंकेनेही धुतले

पोलिसांनी ओळखले सोनसाखळी चोराचे ‘रंग’

शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

महुआ मोइत्रा यांना याची अधिकृत नोटीस मिळाली नव्हती. परंतु त्या ३१ ऑक्टोबरपूर्वी नैतिक समितीसमोर हजर राहतील, असे म्हटले जात आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोइत्रा यांच्यावर त्या संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला होता आणि लोकसभाध्यक्षांकडे या संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. मोइत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यात बेकायदा आर्थिक व्यवाहर झाल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. ही लाच पंतप्रधान मोदी आणि अदानी ग्रुपला लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावाही त्यांनी केला होता.

 

दुबे यांनी गुरुवारी लोकसभेच्या नैतिक समितीपुढे येऊन आपले म्हणणे मांडले. महुआ मोइत्रा यांच्या प्रकरणावरील नैतिक समितीची ही पहिलीच बैठक होती. कोणत्याही खासदाराच्या नैतिक वर्तनाशी संबंधित आरोपाची चौकशी करणे, हे या समितीचे काम आहे. लोकसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची चौकशी हीच समिती करते.
‘माझ्याकडे जी काही माहिती आहे, ती मी समितीला देईन. ते आम्हाला विचारतील आणि आम्ही उत्तर देऊ. कागद खोटे बोलत नाहीत. महुआ मोइत्रा या चोर आहेत की नाही, याचे उत्तर सध्या मिळत आहे,’ अशी प्रतिक्रिया दुबे यांनी दिली.

Exit mobile version