महुआ मोईत्रा पुन्हा अडचणीत

माजी प्रियकराची हेरगिरी केल्याचा आरोप

महुआ मोईत्रा पुन्हा अडचणीत

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात संसदेचे सदस्यत्व गमवावे लागलेल्या महुआ मोईत्रा पुन्हा अडचणीत आल्या आहेत. ज्या व्यक्तीने त्यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता, त्याच व्यक्तीने आपल्यावर मोईत्रा यांच्या सांगण्यानुसार, पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या मदतीने बेकायदा हेरगिरी होत असल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाद्राई यांनी मंगळवारी तृणमूलनेत्या महुआ मोईत्रा यांनी माजी प्रियकराची हेरगिरी केली होती, असा आरोप केला.

देहाद्राई यांनी या संदर्भात २९ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मोईत्रा या माझ्या फोनच्या नंबवरून आपल्या ठिकाणाचा माग काढत असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी मोईत्रा यांनी जवळच्या व्यक्तींचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मिळवण्यासाठी पश्चिम बंगालच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधांचा दुरुपयोग केला होता, असे नमूद केले आहे.

याआधी मोईत्रा यांनी सन २०१९मध्ये त्या माजी प्रियकर सुहान मुखर्जी या व्यक्तीवर नजर ठेवली होती. त्याचे जर्मन महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून मोईत्रा या त्यांच्यावर नजर ठेवत होत्या. मोईत्रा यांनी याआधी मला तोंडी आणि लिखित स्वरूपात (व्हॉट्सएप चॅट) ही माहिती दिली होती, असा दावा देहाद्राई यांनी केला आहे. देहाद्राई यांचे आरोप आणि सीबीआयचौकशीसाठी पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावरून मोईत्रा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती.

‘मी गृहमंत्रालयाकडे विनंती करते की, भारतातील सर्व माजी प्रियकरांच्या तक्रारीच्या चौकशीसाठी एका विशेष सीबीआय संचालकाची नियुक्ती करावी,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. मात्र नंतर त्यांनी ती डिलिट केली.

हे ही वाचा:

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

कर्नाटकचा अजब कारभार; ३१ वर्षांनी कारसेवकाला अटक!

संगीत क्षेत्रातील दर्दी अभ्यासक बाबानंद धोपटे कालवश

अंबिका मसालेच्या अध्यक्षा कमल परदेशी यांचे निधन

देहाद्राई यांचेही महुआ मोईत्रा यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा त्यांनी तत्कालीन प्रेमिका महुआ यांना या हेरगिरीबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी संसद सदस्य म्हणून मला काही अधिकार आहेत, ज्याच्यात कोणावर नजर ठेवणेही समाविष्ट आहे, असे म्हटले होते, असे देहाद्राई यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version