अभिनेत्री माही गिलचा भाजपामध्ये प्रवेश

अभिनेत्री माही गिलचा भाजपामध्ये प्रवेश

बॉलिवूड अभिनेत्री माही गिल हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी माही गिल हिने भाजपाची सदस्यता स्वीकारतील. तर तिच्यासोबतच पंजाबी अभिनेता कमल धालीवाल यानेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंजाब निवडणुकीच्या तोंडावर या दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानले जात आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपाला याचा फायदा होईल असे मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम आणि पंजाब भाजपाचे महामंत्री सुभाष शर्मा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंजाब निवडणुकांच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्वाचा समजला जात आहे. पंजाबमध्ये भाजपा पंजाब लोक काँग्रेस पक्षासोबत युतीत ही निवडणूक लढत आहे.

हे ही वाचा:

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

‘मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव’

बी टाऊन आणि राजकारण हे समीकरण तसं काही नवे नाही. कला क्षेत्रातील अनेक चेहरे आपले चित्रपट सृष्टीतील कारकीर्द संपल्यावर राजकारणात एन्ट्री घेऊन तिथं नशीब अजमावताना दिसतात. तर काही कलाकार ती कारकीर्द सुरू असतानाच राजकारणात शिरून आपले स्थान बळकट करतात. निवडणुकींच्या तोंडावर तर असे प्रसिद्ध चेहरे आपल्या पक्षात यावेत यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. निवडणूक प्रचारातही अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध चेहऱ्यांचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे अभिनेता, अभिनेत्री, गायक, खेळाडू ही सर्व क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी आपल्याला राजकीय व्यासपीठांवर नित्यनियमाने दिसत असतात. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल असल्यामुळे हेच वातावरण पाहायला मिळत आहे.

Exit mobile version