राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांना राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. जेठमलानी यांनी पीटीआयला सांगितले की, “मला राज्यसभेवरील उमेदवारी देण्यात आली आहे.”
महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी हे प्रख्यात वकील होते. त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले होते. नामनिर्देशित गटातील दोन जागा रिक्त झाल्यानंतर जेठमलानी यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. मार्च महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वपन दासगुप्ता यांना उमेदवारी दिल्यानंतर दासगुप्ता यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. तर रघुनाथ मोहपात्रा हे करोनामुळे गेल्या महिन्यात मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी नियुक्ती करायची आहे. केंद्राच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नेमणूक करू शकतात.
हे ही वाचा:
‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळांना हवाय वेळ
चीनमध्ये आता अपत्ये तीन, लेकुरे उदंड होणार
काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली
यामध्ये साहित्य, विज्ञान, क्रीडा, कला, आणि सामाजिक सेवा यासारख्या क्षेत्रातून नावाजलेल्या व्यक्ती असतात. क्रिमिनल लॉ या विषयात महेश जेठमलानी वकिली करत असून सध्या परमबीर सिंग आणि राज्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या न्यायालयीन लढ्यात महेश जेठमलानी त्यांचे वकील म्हणून खटल्यात बाजू मांडतात.
जेठमलानी यांचे सहकारी प्रणव बधेका यांच्या मते महेश जेठमलानी यांना ही उमेदवारी मिळाल्यामुळे राज्यसभेत कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या एका व्यक्तीचा राज्यसभेत प्रवेश होईल. त्यांच्या या ज्ञानाचा संसदेला नक्कीच उपयोग होऊ शकतो.