महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. त्यातील प्रमुख एजन्सीनी महायुतीला जनता कौल देईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
मॅट्रिझने या निवडणुकीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना १५०-१७० जागा दिल्या असून महाविकास आघाडीला ११०-१३० जागा दिल्या आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला चाणक्यने १३०-१३८ जागा दिल्या असून महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
टाइम्स नाऊ जेव्हीसीने महायुतीला बहुमत मिळेल असे म्हटले आहे. त्यात महायुतीला १५९ जागा त्यांनी दिल्या आहेत तर महाविकास आघाडीला ११९ जागा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागा असून १४५ जागा जिंकणारा पक्ष हा बहुमत प्राप्त करतो.
हे ही वाचा:
वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!
चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!
झारखंडमध्येही निवडणुका पार पडल्या. त्यात भाजप प्रणित एनडीएला काठावरचे बहुमत मिळेल असे म्हटले आहे. त्यात एनडीएला ४२ -४७ जागा मिळतील अशी शक्यता आहे. तिथे बहुमतासाठी ४० जागांची गरज आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा- काँग्रेस याना २५-३० जागा मिळू शकतात. मॅट्रिझने हा अंदाज व्यक्त केला आहे तर चाणक्यने एनडीएला ४५-५० जागा दिल्या आहेत तर झामुमो-काँग्रेस यांना ३५-३८ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. तर टाइम्स नाऊ जेव्हीसी यांनी एनडीएला ४०-४४ जागा आणि झामुमो काँग्रेस याना ३०-४० जागा दिल्या आहेत.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रामुख्याने बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद हे मुद्दे चांगलेच गाजले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतुन माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे.
सायंकाळी ५८.४५ टक्के मतदान
महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.४५ टक्के इतके मतदान झाले आहे. यात गडचिरोली जिल्हयात सर्वाधिक मतदान झाले. मुंबई शहरात ४९ टक्के तर मुंबई उपनगरात ५१ टक्के मतदान झाले.
निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत.