विधान परिषद निवडणुकीत महायुतीला सगळ्या ९ जागांवर यश मिळाले असून त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच सरकार बनवेल यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. त्यांना शरद पवार यांच्या गटाचा पाठींबा होता. काँग्रेसची मते फुटल्यामुळे हे यश महायुतीला मिळाले. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ९ जागा जिंकल्या. जे म्हणत होते की मविआचे सगळे उमेदवार जिंकतील, त्यांचेही मतदान आम्हालाच झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल.
हे ही वाचा:
महायुतीच महाराष्ट्रात सरकार बनवणार
काँग्रेसची ५ मतं अजित पवार गटाने फोडली?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मानले आभार!
कर्नाटक सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही
मदरशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत पाठवा !
काँग्रेसच्या गद्दाराना पक्षातून काढणार
“आम्ही या निवडणुकीत काही संशयित काँग्रेस आमदारांच्या पाठीमागे ट्रॅप लावलेला होता. मी कुठेही नाकारत नाही. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
या निवडणुकीनंतर काँग्रेसची मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे कुणीकुणी क्रॉस व्होटिंग केली याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी याबाबत माहिती दिली आहे. आपण ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये क्रॉस व्होटिंग करणारे आमदार सापडले आहेत. त्यांच्यावर आता पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.