महायुतीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा!

संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं

महायुतीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा!

शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र महायुतीच्या नेत्यांनी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना सादर केले. यानंतर आता गुरुवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक ‘वर्षा’वर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळालं. यानंतर यात भाजपा मोठा पक्ष ठरला होता मात्र मुख्यमंत्री पदी कोण असणार याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी अनेक दिवस राजकीय हालचालींना वेग आला होता. अखेर बुधवारी भाजपाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे चित्र स्पष्ट झाले.

हे ही वाचा..

दोघा हिंदू भावांची मुस्लीम कुटुंबाकडून हत्या

सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!

हैद्राबादहून मुंबईत अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या आवळल्या मुसक्या

देवेंद्र फडणवीस झाले गटनेते; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असून महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version