महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! आणखी ‘हे’ निर्णय घेतले

३ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! आणखी ‘हे’ निर्णय घेतले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज, ३ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी २५ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविण्यात येणार असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून १०० टक्के अर्थसहाय्य केले जाणार आहे. तसेच सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार असून रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती

राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version