राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. शिवाय अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिवसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाला मुकावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बुधवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, असे वृत्त ‘सकाळ’ने दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाकरे आणि पवार कुटुंबिय विरहित हे सरकार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले ५० पैकी ५० उमेदवार जिंकून आणू त्या दृष्टीने काम करू. मागच्या वेळी देखील अजित पवार आणि त्यांची टीम भाजपाच्या मागे लागली होती. पण त्यावेळी त्यांना प्राधान्य न देता आपल्याला प्राधान्य दिलं आहे. आपली युती विचारांची होती. मात्र, आता जे झालंय ते पॅालिटिकल ऍडजस्टमेंट आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
‘परसातील साप फुत्कारू लागले आहेत’
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राजीनामा देणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. आपल्या राजीनाम्याच्या बातम्या कुणी पेरल्या याची आपल्याला माहिती आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच अजित पवार आल्याने शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री मीच राहणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.