महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल

महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ होत असताना ठाकरे सरकारचा नवा कारनामा समोर आला आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

महावितरणाच्या अनागोंदी कारभाराचा सामान्य नागरिकांना अवाच्यासवा वीज बिलांच्या रुपाने फटका पडला आहे. त्यातच महावितरणाने पुण्यातील सीओईपी येथील जम्बो कोविड रुग्णालयाचा वीज पुरवठाच खंडित केला आहे.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात मोठी कोरोना रुग्णवाढ

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसचा मोठा दावा

फडणवीसांचे नागरिकांना लस घेण्याचे आवाहन

महावितरणाने वीज बिले न भरणाऱ्या नागरिकांची वीज कापायला सुरूवात केली आहे. यात जम्बो कोविड रुग्णालय देखील सुटले नाही. पुण्यातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता हे रुग्णालय सोमवारपासून पुन्हा चालू करण्यात येणार होते, परंतु त्याची वीज महावितरणाने कापून टाकली आहे. वीज बिलाची थकबाकी राहिल्याने ही कारवाई केली गेली असल्याचे कळले आहे.

एका बाजूला वाढत्या कोरोनाला आळा घालायला पुणे महानगरपालिका कठोर पावलं उचलत आहे. त्यात महावितरणाच्या या कारभारामुळे महावितरणावर जोरदार टीका केली जात आहे.

पाणी विभागाकडून बदला

महानगरपालिकेच्या पाणी विभागाला मात्र महावितरणाची कारवाई पटलेली दिसत नाही. महावितरणाने वीज कापल्यानंतर पाणी विभागाने महावितरणाच्या वसाहती आणि पाच कार्यालयांचे पाणी कापले आहे. त्यामुळे महाविरतण विरुद्ध पाणी विभाग असे कारवाई नाट्य पुण्यात पहायला मिळाले.

Exit mobile version