लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज(८ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेत इंडी आघाडीवर घणाघाती टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच’.काँग्रेस कधीच सुधारणार नाही आणि बदलणारही नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त कमिशन आणि मलाई खाण्याचं काम झालं, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला मी नमन करतो.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना माझे वंदन.चंद्रपूर करांना माझा नमस्कार.उन्हाचा पारा वाढत आहे तसेच प्रचाराचा पाराही वाढताना दिसतोय.पण तुमच्या उत्साहात कोणतीही कमी बघायला मिळत नाही.
यावेळी चंद्रपूरने देखील ठरवले आले की, पुन्हा एकदा मोदी सरकार, एवढा मोठा स्नेह मिळणं माझ्यासाठी आणखी विशेष आहे. ही चंद्रपुरी आहे ज्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी लाकूड पाठवले.नव्या भारताच्या प्रती संसदेच्या नव्या इमारतीसाठीसुद्धा चंद्रपूरचं लाकूड लागले आहे.चंद्रपूरची ख्याती पूर्ण देशात पोहोचली आहे. मी चंद्रपूरच्या नागरिकांना खूप शुभेच्छा देतो. उद्यापासून नववर्ष आणि नवरात्रीचा पावन पर्व सुरु होतोय. सर्व देशवासियांना या पर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. समस्त बंधुबघिणींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा मंत्र जिथे सत्ता तिथे मलाई खावी’
ते पुढे म्हणाले, मित्रांनो लोकसभा २०२४ ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली निवडणूक आहे. एकीकडे भाजपा एनडीए आहे.देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे ध्येय आहे.तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी.इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे.एका स्थिर सरकारची आवश्यकता का? आणि किती आवश्यक आहे, हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कमिशन द्या अन्यथा कामाला ब्रेक लावा
इंडिया आघाडीची जोपर्यंत केंद्रात सरकार होती तेव्हा महाराष्ट्राची उपेक्षा सारखी होत गेली.इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. परिवाराचा विकास केला.कोणाचा किती वाटा, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात, किती येणार हिशोबातच यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकले होते. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रोजेक्ट पाहिल्यावर हे बोलत असत , कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा. जेव्हा या ठिकाणी नवीन विमानतळाची गोष्ट आली, तेव्हा इंडी आघाडीच्या लोकांनी सांगितले कमिशन आणा किंवा काम बंद करा.या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली.बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही इंडी आघाडीच्या लोकांनी बंद केली.
हे ही वाचा:
हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!
निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू
‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!
गरीब लोकं मोदी सरकारला आपले सरकार मानतात
विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं त्यालाही या लोकांनी विरोध केला होता. या लोकांनी मराठवाड्याची सिंचन योजना बंद केलं. कोकणात रिफायनरी प्रोजेक्ट थांबवला, मुंबईत मेट्रो प्रकल्प रोखला होता, पीएम आवास योजनेसाठी केंद्रातून पैसे आल्यानंतरही त्यांनी गरिबांना घर देणं बंद केलं होतं.त्यांचं एकच लक्ष होतं, कमिशन आणा नाहीतर कामावर ब्रेक लावा.आमच्या सरकारने महाराष्ट्र-विदर्भ विकासासाठी या सर्व योजना सुरु केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संपूर्ण सरकार दिवसरात्र काम करत आहे.विकासाची कामे वेगाने पूर्ण होत आहेत.जेव्हा तुमची नियत योग्य असते त्याचे परिणाम देखील योग्य असतात.देशाचा दलित, आदिवासी, गरीब मोदी सरकारला आपले सरकार मानतात.
मोदींचा गरीब कुटुंबात जन्म शाही कुटुंबात नाही
मोदी कोणत्याही शाही परिवारात जन्म घेऊन प्रधानमंत्री नाही झाला.मोदी एक गरीब परिवारात जन्म घेऊन, तुमच्या मध्ये राहून, इथपर्यंत तुम्ही पोचवले आहे.त्यामुळे मला माहिती आहे, ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर न्हवते , त्यामध्ये जास्तकरून दलित, आदिवासी, वंचित होते.यांच्या वस्तीमध्ये पिण्यासाठी पाणी न्हवते, वीज, रस्ते नव्हते.शिक्षणाच्या अभावामुळे या समाजाला जास्त करून ठोकरे खावी लागत.त्यामुळे मोदीने गँरंटी दिली होती.आमची सरकार दलित, आदिवासी समाजासाठी काम करेल.
वंचितांची परिस्थिती बदलण्यासाठी मोदीने मेहनत केली आहे.देशातील चार करोड लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला आहे, ज्यामध्ये जास्त करून याच समाजाची लोकं आहेत.वंचितांच्या प्रत्येक घरात आम्ही शौचालय बांधले. ८० करोड गरजू लोंकाना आम्ही मोफत राशन देत आहोत.यामध्ये दलित, आदिवासी वर्ग जास्त प्रमाणात आहे.आज ५० लाखांहून अधिक लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहे.आज गरीबवर्ग डोकेवर करत जगत आहे.याचे सर्व श्रेय मोदींचे नाहीतर ही सर्व ताकत तुमच्या एका मताची आहे.तुम्ही फक्त मोदीला आशीर्वाद दिला आहे.हे जे पुण्याचे कार्य आहे त्यामध्ये तुमचा देखील तेवढाच हक्क आहे.
काँग्रेस पक्ष स्वतःच समस्यांची जननी
काँग्रेस पक्ष स्वतःच समस्यांची जननी आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे विभाजन कोणी केले, काश्मीरमध्ये समस्या निर्माण कोणी केली? असे विचारले असतात, जनतेचा एकच आवाज आला तो म्हणजे ‘काँग्रेस’.आमच्या मागून अनेक देश पुढे गेले तेव्हा जास्तकरून काँग्रेसची सरकार होती.आतंकवाद्यांना संरक्षण देण्याचे काम काँग्रेस करत होते.नक्षल वाद्यांचा लाल आतंक ही देण काँग्रेसची होती.राम मंदीराच्या अस्तित्वावर, राम मंदिराच्या सोहळ्यावर, याच लोकांनी बोट करून बहिष्कार टाकला.
गडचिरोची आता स्टिल सिटी म्हणून ओळख
मागील १० वर्षांपासून काँग्रेस सत्येपासून बाहेर आहे.तुम्ही एनडीएला मत दिलं आणि आम्ही मोठं मोठ्या समस्यांवर उपचार केले आहेत.महाराष्ट्र नाहीतर संपूर्ण देशात नक्षलवाद कमजोर पडला आहे.गडचिरोली हा नक्षलवादी भाग म्ह्णून ओळखला जायचा. मात्र आता त्याची ओळख विकास आणि स्टिल कंपन्यांसाठी होत आहे.गडचिरोली आता स्टिल सिटी बनत आहे.
काँग्रेस म्हणाले, ‘कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच’
आमच्याइकडे मराठी मध्ये एक म्हण आहे, ‘कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच’. ही म्हण काँग्रेसला लागू होते.ते कधीच सुधारणार नाहीत, कधीही बदलणार नाहीत.काँग्रेसच्या घोषणपत्रात सुद्धा मुस्लिम लीगची भाषा वापरली आहे.तुम्हाला हे मंजूर आहे ? देश हे स्वीकार करेल? असा सवालही त्यांनी जनतेला विचारला.यांची लोकं देश विभाजनाची भाषा करत आहेत.इंडी आघाडीची लोकं दक्षिण भारताला वेगळे करण्याची धमकी देत असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
शिवसेना शिंदेंचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारणा पुढे नेत आहे
एकनाथ शिंदे आणि त्यांची पार्टी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मजबुजीतने पुढे नेण्याचे काम करत आहे, याचा मला आनंद आहे.चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, आणि गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.