विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या मतांची चर्चा; भोयरना एक मत कुणाचे?

विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या मतांची चर्चा; भोयरना एक मत कुणाचे?

विधान परिषदेच्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांत भाजपाने नागपूर आणि अकोल्याच्या जागा जिंकल्यानंतर त्यात महाविकास आघाडीची मते फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागपूर, अकोल्यात किती मते फुटली याचे वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत. काही मते अवैधही ठरली आहेत. त्यामुळे यावर आता खुमासदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

या निवडणुकीत नागपूरच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते पडली. त्यावर बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीत आम्हाला ३१८ मते मिळतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात अधिक मते पडली. ४४ मते फुटली आहेत. ती काँग्रेसची आहेत, शिवसेनेची आहेत की राष्ट्रवादीची हे स्पष्ट होईल.

या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकूण ९६ मते फुटल्याची चर्चा सुरू आहे. भाजपा नेते आणि आमदार आशीष शेलार यांनीही ९६ मते फुटल्याचे म्हटले आहे. नागपूरमधील निवडणुकीसाठी भाजपाकडे आवश्यक ते संख्याबळ होते. काँग्रेसने या निवडणुकीत चमत्कार घडविण्याचा विश्वास व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात भाजपालाच अपेक्षेपेक्षा जास्त मते पडली. या निवडणुकीत ५ मते अवैध ठरली.

अकोल्यात तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरिया यांना मात खावी लागली. वसंत खंडेलवाल यांनी त्यांचा १०९ मतांनी पराभव केला. त्यातली ३१ मते तर चक्क अवैध ठरली. बाजोरिया यांना ३३४ तर खंडेलवाल यांना ४४३ मते पडली. या दोन्ही निवडणुकांत मिळून ३६ मते अवैध ठरली आहेत.

हे ही वाचा:

इंडोनेशियात भूकंपामुळे सुनामीची भीती

श्रीलंकेत संसद बरखास्त, संसदीय लोकशाही धोक्यात?

समीर वानखेडे यांची माफी मागा अन्यथा… नवाब मलिक यांना धमकीचे पत्र

देशमुख यांनी माझ्याकडे पैसे मागितले नाहीत

 

नागपूरला अखेरचे १२ तास राहिलेले असताना छोटू भोयर यांचा पत्ता कापण्यात आला आणि काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. त्या भोयर यांनाही एक मत पडले. पण ते मत कुणाचे याचा शोध घेऊ असे भोयर म्हणत आहेत. मी देशमुख यांना मते द्या असे आवाहन केले होते, पण मला कुणीतरी एक मत दिले आहे.

मतांबद्दल ते म्हणाले की नागपूरमध्ये १८ मतं फुटली. ३३४मध्ये १८ मतांची भर घातली ३६२ होती. १८ मतांना छेद दिला गेला आहे. ती आघाडीची आहेत की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची आहेत हे शोधू.

Exit mobile version