30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणहिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

Google News Follow

Related

अमरावती दंगलीनंतर कवारवाई करताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले असा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

१२ तारखेचा मोर्चा चुकीच्या आधारे निघाला असल्याचे फडणवीस यांनी म्ह्टले आहे. त्रिपुरात ज्या घटनाच घडल्या नाहीत त्याचे सोशल मीडियावर चुकीच्या माध्यमातून क्रिएटिव्ह तयार करून वापरले गेले. ते व्हायरल केले गेले. मशिदीचा फोटो म्हणून जो दाखवला गेला ते सीपीआयचे कार्यालय होते, कुराण शरीफ जळाल्याचे जे सांगण्यात आले ते कुराण शरीफ नव्हतेच. तर यामध्ये रोहिंग्यांचे फोटो होते, पाकिस्तानचे फोटो होते. त्यामुळे हे सारे मोर्चे सुनियोजितपणे काढले गेले आणि या खोट्या गोष्टी जाणिवपूर्वक पसरवल्या गेल्या असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे या मागे नेमके कोण होते याचा तपास झाला पाहिजे. १२ च्या मोर्चाला परवानगी कोणी दिली? दिली तर किती जणांची फिली? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. 

या मोर्चात जाणीवपूर्वक ठराविक धर्माच्या लोकांची दुकाने टार्गेट करून जाळली गेली. ठरविकपणे लोकांना टार्गेट करून हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामागे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात दंगल भडकावण्याच्या हेतूनेच असे प्रकार सूरु होते. यात महाराष्ट्रात अराजक माजवण्याच्या हेतून हे मुद्दाम केले गेले असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

१२ तारखेच्या या मोर्च्याला डिलीट करून १३ तारखेच्या प्रतिक्रियेवर सरकारचे नेते, मंत्री भाष्य करत आहेत. तेवढीच घटना अधोरेखित करत आहेत. पोलिसांकडूनही कारवाई करत असताना एकतर्फी कारवाई होत आहे. भाजपाच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडीचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’

देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

एकाच व्यक्तीवर चार वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. बेल मिळाल्यानंतर नव नवे गुन्हे दाखल केले जात होते. जे त्या ठिकाणी उपस्थितच नव्हते त्यांना मुद्दाम अडकवण्यात येत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 

एक मुलगा चालून येणारा जमाव पाहून त्याची गाडी हटवत होता. तर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला नेऊन सोडून देऊ असे पोलिसांनी सांगितले. पण पोलिसांनी त्याच्यावर ३०७ सारख्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला. अमरावतीच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन सुरु होते. त्या अधिवेशनात सहभागी झालेल्या लोकांची यादी मागवून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले.

त्यामुळे सरकारने या संपूर्ण प्रकरणात एकतर्फी कारवाई केलेली आहे. १२ तारखेची मुख्य घटना सरकारने डिलीट केले. त्याची प्रतिक्रिया म्हणून झालेल्या १३ तारखेच्या घटनेला अधोरेखित करून कारवाई केली. त्यामुळे सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

तर रझा अकादमी ही काँग्रेसची सत्ता असतानाच सक्रिय कशी होते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. २०२१ चा आझाद मैदानाचा मोर्चा निघाला तेव्हा देखील सत्तेत काँग्रेस पक्ष होता आणि आत्ताही काँग्रेसचं आहे असे फडणवीस म्हणाले. तर आज मी रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणी करत आहे. सरकारमध्ये हिम्मत आहे का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.    

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा