23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण"महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा महाराष्ट्राची लूट करू देऊ नका"

“महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा महाराष्ट्राची लूट करू देऊ नका”

चिमूरमधील सभेतून नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घाणाघात

Google News Follow

Related

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर येथील चिमूर मधील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर टीकास्त्र डागत त्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. अशा महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा लूट करण्यासाठी संधी देऊ नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले. महाविकास आघाडीने कधीही विकासाची कामे होऊ दिली नाहीत. खरं तर विकासाची कामे बंद पाडण्यात त्यांची पीएचडी झालेली आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गासह अनेक मोठमोठ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम आघाडीने केलं हे लक्षात ठेवा. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. अशा महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा लूट करण्यासाठी संधी देऊ नका,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नरेंद्र मोदींनी पुढे म्हटले की, चंद्रपूरने अनेक वर्षे नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले त्यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाहीत. आम्ही नक्षलवादावर लगाम लावला त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत. करोडो लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला. देशातील २५ कोटी लोकं दारिद्र्याच्यारेषेबाहेर आले. शिवाय नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’ असे म्हणत सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार म्हणजे दुप्पट वेगाने विकास. आज महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या राज्यात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्रात अनेक विमानतळ निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात जवळपास १२ वंदे भारत ट्रेन सुरु आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा :

रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

अतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री!

भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

जम्मू- कश्मीर अनेक दशकं दहशतवादात होरपळत होता. संविधानाची माळ जपणाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नव्हतं. मात्र, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून काश्मीरमधील लोकांचं भारताशी नातं जोडलं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि येथील उच्च न्यायालयातील न्यायाधीश संविधानाची शपथ घेत नव्हते. कारण, ३७० कलम लागू असल्याने ही मोठी अडसर होती. मात्र, आपल्या आशीर्वादाने मोदी सरकार आल्यानंतर आम्ही कलम ३७० हटवले. पण, काँग्रेसवाल्यांना हे पचनी पडत नाही, म्हणूनच तेथील सरकार काँग्रेससह पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करत आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा