मुंबईच्या जवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. परंतु त्या पार्टीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याचा मुलगाही होता, अशी खात्रीलायक बातमी आहे.
क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीत आर्यन खान याच्यासह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंह, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा, नुपूर सारीका आणि विक्रांत चॉकर यांना अटक करण्यात आली. परंतु या आठजणांच्या व्यतिरिक्त पुण्यातील बड्या राजकीय नेत्याचा मुलगा या पार्टीत होता.
एनसीबीच्या पथकाने कारवाई झाल्यानंतर क्रूझवर असलेल्या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. परंतु हा तरुण तिथून निसटण्यात यशस्वी झाला असे समजते. या तरुणाच्या मोठ्या भावाने अलिकडेच राजकारणात पदार्पण केले असून परिवारातील वादामुळे तो चर्चेतही आला होता.
शाहरुखचा मुलगा आर्यन हा या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानचा जुना व्हीडीओही व्हायरल झाला आहे. या व्हीडियोमध्ये आर्यनने ड्रग्ज, सेक्स सर्व काही करावे असे शाहरुख म्हणाला आहे. या कारवाईनंतर मीडियाचा संपूर्ण फोकस आर्यनवर आहे. परंतु जर त्या तरुणाला अटक झाली असती तर चर्चेचा फोकस निश्चित वेगळा असता. क्रूझवर ताब्यात घेतलेला तरुण या ड्रग्ज प्रकरणात सामील होता की नाही याबाबत उलगडा झाला नाही. परंतु हा तरुण त्या क्रूझवर होता हे मात्र निश्चित. तो निसटण्यात कसा यशस्वी झाला हेही एक मोठे कोडे आहे.
हे ही वाचा:
आर्यन खानसह आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
… म्हणून ट्रुडो करणार या ‘खलिस्तानी’ मंत्र्याची हकालपट्टी
कृषी कायद्यांना स्थिगिती दिल्यानंतर तुम्ही कशाचा विरोध करताय?
अफगाणिस्तानमधील आर्थिक, सामाजिक ढाचा कोसळण्याच्या मार्गावर
मुलगा कोणाचाही असो, कारवाई झालीच पाहिजे. कायद्यासमोर सगळे सारखे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रूझवर झालेल्या कारवाईनंतर दिली होती. ही त्या घटनेवर व्यक्त केलेली नियमित प्रतिक्रिया होती की, या प्रतिक्रियेचा क्रूझवरच्या ‘त्या’ तरुणाशी काही संबंध होता ही बाब मात्र स्पष्ट झालेली नाही. आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीचे आदेश कोर्टाने दिले आहेत.