जगाला कोविड-१९ महामारीने पछाडले आहे. त्यावर भारतातील प्रसिद्ध योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीने कोरोनिल हे औषध बाजारात आणले आहे. महाराष्ट्रात मात्र योग्य प्रमाणपत्रांशिवाय या औषधाची विक्री करण्यास बंदी असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. पतंजलीचे औषध कोविड-१९वर गुणकारी असल्याचे कंपनीने प्रयोगांतून सिद्ध केले आहे. या बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणपत्राबाबत असत्य सांगितले जाण्यावरून आश्चर्य व्यक्त केले आहे.
ड्रग्स काँट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) या केंद्रीय संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. प्रसिद्ध योग गुरू बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी पतंजली आयुर्वेदच्या कोरोनिल या गोळीला आयुष मंत्रालयाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनांनुसार कोविड-१९ या आजारावरील उपचारांत सहाय्यक औषध म्हणून प्राप्त झाले आहे. त्यामुळे याला थेट जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्याचा समज पसरला होता. मात्र, पतंजलीचे संचालक व्यवस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्ट केले की ही मान्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनांनुसार ड्रग्स काँट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) प्राप्त झाले आहे.