किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आलेले अभिनेता किरण माने याच्या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे. माने यांच्या पत्नी ललिता किरण माने यांच्या तक्रार अर्जावरून महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. या संबंधित ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम करत असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. पण पुरोगामी विचारांचे असून विविध माध्यमातून वैचारिक भूमिका मांडत, लिहित असल्यामुळे त्यांना कोणतीही पूर्व संधी व सूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मालिकेच्या निर्मात्यांच्या या कृतीमुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

‘पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय’; अटक करण्याची नितीन गडकरींची मागणी

या तक्रारीवरून महिला आयोगाने ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्या आणि पॅनारोमा एंटरटेनमेंट प्रमुख सुझाना घाई यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या अंतर्गत त्यांना महिला आयोगाच्या ईमेल आयडी वरून लेखी खुलासा पाठवण्यास सांगितला आहे. त्यामुळे किरण माने प्रकरणात आता नवीन काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरण माने हे स्वतः दावा करतात की त्यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना कार्यक्रमातून काढून टाकण्यात आले. तर मालिकेच्या निर्मात्यांचा आणि सहकलाकारांचा दावा आहे की माने याची सेटवरची वर्तणूक नीट नसल्यामुळेच त्याला काढण्यात आले. त्या आधी माने याला वार्निंग देण्यात आली होती. तरीही मानेने आपली वर्तणूक सुधारली नसल्याचा दावा निर्मात्यांचा आहे.

Exit mobile version