नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला दररोज प्राणवायूचा पुरवठा

नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला दररोज प्राणवायूचा पुरवठा

महाराष्ट्रातील कोविडने भयानक रुप धारण केले आहे. दररोज हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ होत आहे.  त्यामुळे राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांचा चांगलाच तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे विशाखापट्टणमवरून महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे निघाली ऑक्सिजन एक्स्प्रेस

नागपूरात कोविड रुग्ण फरार

सेन्सेक्समध्ये आज उसळी

महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने शक्य त्या सर्व मार्गांनी ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून दररोज उपलब्ध होणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्याबद्दल भाजपा महाराष्ट्रने ट्वीटरवरून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी देखील नागपूरातील कोविड रुग्णांसाठी अधिक खाटांची सोय उपलब्ध करून दिली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना फोन करून त्यांच्याकडे रेल्वेमार्फत ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल का अशी कल्पना मांडतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर भारतीय रेल्वेने मुंबईसाठीच नव्हे तर देशातील विविध भागांसाठी ऑक्सिजन एक्सप्रेसची आखणी केली आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देखील दिला.

मुंबईसाठी पहिली सात क्रायोजेनिक कंटेनर असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस दोन दिवसांपूर्वी पनवेल नजीकच्या कळंबोली यार्डातून निघाली होती. ती गाडी आज विशाखापट्टणम येथे आज पोहोचली आहे. येत्या काही काळातच ही गाडी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे.

Exit mobile version