विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज, २० जून रोजी मतदान सुरू झाले आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस रंगली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला तर भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले आणि महाविकास आघाडीला दणका बसला. याही निवडणुकीत चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

‘अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन उचकावण्यात काँग्रेसचा हात’

‘बाळासाहेबांचे विचार विसरलेले आमदारचं काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील’  

तोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद

“मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही”

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या २८८ आहे. पण शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या आमदारांची संख्या २८५ आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे मिळून सहा उमेदवार आहेत तर भाजपचे पाच उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी २६ मतांची गरज आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार

Exit mobile version