१ मे ठरणार भाषण दिवस

१ मे ठरणार भाषण दिवस

उद्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन. पण महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात उद्याचा दिवस हा सभा दिवस ठरणार आहे. महाराष्ट्रात उद्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी, तीन वेगवेगळ्या पक्षांच्या आणि तीन बड्या राजकीय नेत्यांच्या सभा होणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. तर मुंबईतील सोमय्या ग्राउंड येथे भारतीय जनता पार्टीची सभा असून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे ही वाचा:

फलंदाजीतला मोहिनी अवतार!!

स्विगीची आता हवाई डिलिव्हरी

मविआ सरकार रझा अकादमीवर बंदी का घालत नाही?

ग्यानव्यापी मशिदीत व्हिडीओग्राफीला नकार; न्यायालयाचा अवमान?

या तिन्ही सभांमुळे उद्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांच्या पहिली पाहायला मिळणार आहेत. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्याला हात घालून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. तर मुंबईत सुरू असलेले भाजपाचे पोलखोल अभियान शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत आहेत. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा भाजपातर्फे घेण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर तुटून पडणार हे स्पष्ट आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रविवार १ मे चा दिवस हा महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा रंगणारा दिवस ठरणार यात शंका नाही!!

Exit mobile version