पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढते, तेव्हा सत्तेचा ऱ्हास येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

“शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं. यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

“प्रश्न उपस्थित केला की मोहन डेलकर आत्महत्या सांगायचे. वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही. भाडे थकीत आहे, सरकारी इमारतीवर, गोरगरीबांसाठी काहीही पॅकेज नाही. आत्मनिर्भर, शक्तीमान, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी अनेक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नाही. असं सरकार टिकवणं ही राजकीय दृष्टीने सर्वात मोठी घोडचूक होईल,” असा दावाही मुनगंटीवारांनी केली.

Exit mobile version