महाराष्ट्रात आता बैल धावणार

महाराष्ट्रात आता बैल धावणार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बैलगाड्या शर्यती संदर्भातील सुनावणीत हा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटक, तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये बैलगाडा शर्यत ही सुरळीतपणे सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. पण बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरु व्हावी यासाठी कोर्टाचे दार ठोठावण्यात आले होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो याकडे साऱ्या राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या या सुनावणीत महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अशा स्वरूपाची परवानगी दिली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली असून आज म्हणजेच गुरुवार, १६ डिसेंबर रोजी यात आणखीन एका न्यायाधिशांची भर पडली आहे. त्यामुळे तीन पुरुषांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यामध्ये महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडली असून आज बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या प्राणी मित्र संघटना आपली बाजू मांडणार होत्या. महाराष्ट्र सरकारच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी या विषयात युक्तिवाद केला आहे.

न्यायाधीश खानविलकर, न्यायाधीश रविकुमार आणि न्यायाधीश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ साली महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. तर या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हे ही वाचा:

अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!

बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश

तर शर्यतीच्या निमित्ताने प्राण्यांवर अत्याचार केले जातात. त्यामुळे या शर्यतींवर बंदी घालण्यात यावी असा दावा प्राणिमित्र संघटनांनी केला होता. त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागांमध्ये आंदोलने उभारण्यात आली होती. तर या बैलगाड्या शर्यती म्हणजे महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे त्याचे जतन झाले पाहिजे आणि या शर्यतींवर महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे असा युक्तिवाद शर्यतीच्या समर्थकांकडून केला जात होता. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नेमके कोणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे साऱ्या राज्यातही नागरिकांचे लक्ष्य लागले होते.

तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नागरिक आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तर बैलगाडा मालकांमध्येही प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Exit mobile version