मार्च महिन्यापर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राणे यांनी हा दावा केला आहे. राणे यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना राणे यांनी मार्चपर्यंयत महाराष्ट्रात भाजपायाचे सरकार येईल असे म्हटले. शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघडीचे सरकार पडेल आणि भाजपा सरकार स्थापन करेल असे राणे म्हणाले. तर याबद्दल अधिक खोलात विचारले असता सगळी गुपिते आत्ताच सांगू शकत नाही असे राणे म्हणाले. तर जेव्हा एखादे सरकार पडायचे असते तेव्हा सर्व गोष्टी अशा खुल्या करायच्या नसतात असे राणे म्हणाले.
हे ही वाचा:
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर
मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट
दरम्यान शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीत पोहोचल्याचे वृत्त आहे. कालपासून महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक नेते दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर फडणवीस यांनी देखील अमित शहांची सदिच्छा भेट घेतली आहे.
पण आपण दिल्लीत फक्त संघटनात्मक बैठकीसाठी आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मध्यमसनही बोलताना त्यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काय भाकित केले आहे, याची मला कल्पना नाही” असे सांगितले.