महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

महाराष्ट्राला लवकरच पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का? अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका ताज्या विधानाने या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रश्मी ठाकरे यांना मुख्य जबाबदारी मिळू शकते असे सत्तार यांनी म्हटले आहे. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का? असा सवाल विचारला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून ठीक नाही. त्यांच्यावर मणक्याची एक गंभीर स्वरूपाची शाश्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सध्या ते विश्रांती घेत आहेत. क्वचितच मुख्यमंत्री ठाकरे हे राज्याच्या कारभारात लक्ष घालताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची तब्येत ठीक होईपर्यंत आपली जबाबदारी इतर कोणावर तरी सोपवावी असा सल्ला विरोधी पक्षाकडून त्यांना देण्यात आला होता.

हे ही वाचा:

अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…

‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना

राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; मात्र निर्बंध कठोर करणार

तशाच प्रकारचे विधान आता शिवसेनेच्याच गोटातून येताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्य जबाबदारी देऊ शकतात असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. रश्मी ठाकरे या मुख्य जबाबदारी सांभाळायला सक्षम आहेत. त्या सामनाचे संपादक पद सक्षमपणे हाताळत आहेत. तर त्या सध्या पडद्यामागून निर्णय घेत आहेत असा दावाही सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांना मुख्य जबादारी देण्यात येऊ शकते असे सत्तार यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version