ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त

ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने इंधानावरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारवर सर्वच स्तरामधून इंधन दर कमी करण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यानंतर राज्य सरकारनेदेखील दिलासादायक निर्णय घेत व्हॅटमध्ये सूट जाहीर केली आहे.

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले असून पेट्रोल २ रुपये ६ पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल १ रूपया ४४ पैशाने स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने शनिवार, २२ मे रोजी पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य सरकारांना देखील करात कपात करण्याचे सांगितले होते.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांना राज्य सरकार कडून अपेक्षा होत्या. राज्य सरकारवर इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक स्तरांवरून दबाव देखील येत होता. त्यानंतर अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने इंधन दर कमी केला आहे.

हे ही वाचा:

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही केंद्राने दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत नऊ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी दिली आहे. पहिल्या बारा गॅस सिलेंडरवर ही सबसिडी असणार आहे. यामुळे वर्षाला सुमारे ६ हजार १०० कोटींचा केंद्र सरकावर भार पडणार आहे.

Exit mobile version