महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा आणि सर्वसामान्यांना आनंद देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. तसेच गुढी पाडव्याची मिरवणूकही काढता येणार आहे. मुस्लीम बांधवांना देखील रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्रासह देश निर्बंधाच्या कचाट्यात होता. मात्र आज मंत्रीमंडळात एकमताने राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच राज्य मास्कमुक्ती करण्यात आले असले तरी स्वतःच्या काळजीसाठी मास्क वापरावा असे सांगण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीव्ही ९ शी बोलताना भातखळकर म्हणाले, राज्य सरकराने सर्व निर्बंध जरी हटवले असले तरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे ऐच्छिक आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच आमची भूमिका ही लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच असेल, असेही भातखळकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय

कर्नाटकात हलाल मांसवर बंदी घालण्याची मागणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केले आहे.

Exit mobile version