आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नातेवाईक पाहून कारवाई होत नाही. गुन्हे घडले की कारवाई केली जाते, उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराचे उत्तर दिले पाहिजे, असे फडणवीस मुख्यमंत्र्याना उद्देशून म्हणाले आहेत
माध्यमांद्वारे फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, ” विधानसभेत जे मुख्यमंत्री म्हणाले आम्ही तुमच्यासोबत येतो, मात्र मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने हे म्हटले नव्हते आणि आम्ही २०२४ विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही स्वतःच्या भरोश्यावर सरकार स्थापन करू. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलत आहेत याचा आम्ही विचार करत नाही. ”
फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. महाराष्ट्रातले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचे जे नावलौकीक आहे, ते ठीक राहिले पाहिजे. आणि हे कुठेतरी हे सर्व थांबले पाहिजे, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेनेकडून स्वतः पुन्हा मुख्यमंत्री उत्तर देणार की आणखी कोणी, हे पाहावे लागेल.
हे ही वाचा:
आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने
उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?
मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!
मुख्यमंत्री गुड गोइंग ते बॅड गोइंग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उत्तर दिले पाहिजे. या संदर्भात सगळ्यांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. पण त्या राजकारणापेक्षाही मला चिंता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रामध्ये जी गव्हर्नन्सची अवस्था पाहायला मिळत आहे, ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती, असे फडणवीस म्हणाले आहेत.