शाई फेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे सरकारने घेतला निर्णय

शाई फेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्याठिकाणी स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह गुन्हे शाखेचे पाच पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. मंत्री पाटील यांना राज्य पोलिसांच्या सुरक्षेशिवाय सीआयएसएफ, केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षाही देण्यात आले आहे. त्यात वाढ करण्याचाही विचार आहे. शिंदे सरकारमधील मंत्री असलेले पाटील हे पुण्यातील कर्वेनगर भागाच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी वारजे पोलीस ठाण्याचे ५० पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेचे पाच अधिकारी, वाहतूक पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात आहेत.

चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर १० डिसेंबर रोजी सायंकाळी शाई फेकण्यात आली. मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी  चंद्रकांत पाटील येथे आले होते. त्यावेळी समता परिषदेच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर शाई फेकली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. चंद्रकांत पाटील यांच्या घराभोवतीच सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले होते. पिंपरी शहर पोलीस आयुक्तांनी ही घटना गांभीर्याने घेतली . पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. अंकुश शिंदे यांनी आठ पोलिस कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांसह एकूण जणांना निलंबित केले आहे. मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याची माहिती आहे.

Exit mobile version