राज्यातील तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट! स्कॉचवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात

राज्यातील तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट! स्कॉचवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात

महाराष्ट्रात एकीकडे डिझेलवरील VAT कमी करण्यात यावा अशी मागणी होत असतानाच ठाकरे सरकारने मात्र दारूवरील कर कमी केला आहे. तोसुद्धा तब्बल ५० टक्क्यांनी. ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेताना परदेशातून आयात होणाऱ्या दारूवरील कारमध्ये कपात केली आहे. स्कॉच व्हिस्की या प्रकारातील दारूवरील एक्साईज ड्युटी ही ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात परदेशातून येणारी दारू स्वस्त होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये परदेशातून आयात करण्यात आलेल्या स्कॉच व्हिस्की वर तीनशे टक्के एक्साईज ड्युटी होती. पण आता ही एक्साईज ड्युटी कमी करून दीडशे टक्के करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील इंपोर्टेड स्कॉच व्हिस्कीची विक्री वाढून राज्याला मिळणारा महसूल वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात

‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’

गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी या संदर्भातले परिपत्रक महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आले आहे. या पत्रकानुसार राज्याला परदेशातून आयात होणाऱ्या स्कॉचच्या विक्रीतून शंभर कोटींचा महसूल मिळतो. पण या दारूची किंमत कमी झाली तर विक्री वाढून हा महसूल अडीचशे कोटी पर्यंत वाढू शकतो. आत्ताच्या घडीला एक लाख बाटल्या परदेशी स्कॉचच्या महाराष्ट्रात विकल्या जात असून ही विक्री अडीच लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज सरकार मार्फत वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दारू विक्रीला चालना देण्यासाठी सरकारकडून एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण यावरून राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र डागले आहे. ट्विटरच्या माध्यमातून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधताना ‘हजार कोटींच्या वसुलीसाठी सरकारचा खटाटोप चालला आहे’ असे म्हटले आहे.

Exit mobile version