महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

२९ नोव्हेंबरला होणार सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी महत्वाच्या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेली असून मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी ही सुनावणी पार पडणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि १६ आमदारांची अपात्रता अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती. मात्र घटनापीठाने ही सुनावणी चार आठवडयांनी पुढे ढकलली आहे. दोन्ही पक्षच्या वकिलांनी न्यालयायची सूचना मान्य केली आहे. त्यानुसार पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.

चार आठवड्यानंतर दोन्ही पक्षकारांना कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दोन्ही बाजूंच्या वकिलांना एकत्र बसून चर्चा करण्याचे तसेच दोन्ही बाजू लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोन्ही बाजूंनी चर्चा करून महत्वाचे मुद्दे द्या असंही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच दोन्ही पक्षकारांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्षावर आपला हक्क सांगितला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयात पोहचली. पण खरी शिवसेना कोणाची याचा निवड निवडणूक आयोग करणार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सांगितले आहे. परंतु, आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. या फैसल्यासाठी आता पुन्हा २९ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

Exit mobile version